अरेच्‍चा, सिंदखेड राजात केंद्र-राज्‍य सरकारचेच लावले लग्‍न!; स्वाभिमानी “जरा हटके’ आंदोलनाची जिल्हाभर चर्चा

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल, ९ ऑगस्टला चक्क केंद्र आणि राज्य सरकारचेच लग्न लावून टाकले. तहसील कार्यालयासमोर पारंपरिक पद्धतीने लागलेल्या या लग्नाची चर्चा जिल्हाभर होत आहे. नंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास कंपन्या टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल, ९ ऑगस्‍टला चक्‍क केंद्र आणि राज्‍य सरकारचेच लग्‍न लावून टाकले. तहसील कार्यालयासमोर पारंपरिक पद्धतीने लागलेल्या या लग्‍नाची चर्चा जिल्हाभर होत आहे. नंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास कंपन्या टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना शेतकरी करत आहेत. कित्‍येक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्‍महत्‍या केल्या आहेत. वारंवार आंदोलने करूनही दोन्‍ही सरकार गंभीर उपाययोजना करत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड, अनिल मोरे, विकास उगले, योगेश राठोड, अनिल लांडगे, संजय चाटे, आकाश लाड, राजू राठोड, पवन जाधव, समाधान मुळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.