चिखली बसस्थानकावर युवासेनेेच्या उपजिल्हाप्रमुखांनी केले "बोंबला आंदोलन"! पहा व्हिडिओ..

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर आपल्या आगळ्या वेगळ्या हटके आंदोलनांनी चर्चेत असतात. मागील महिन्यांत अवैध रेतीची वाहतूक करून रस्त्यांचा खेळखंडोबा करणाऱ्या माफियांना गांधीगिरी करीत केलेले चहापान आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते. आता पुन्हा असेच एक आगळेवेगळे  "बोंबला" आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे.

त्याचे झाले असे की, चिखली आगारात डिझेलचा तुटवडा असल्याने अनेक बसफेऱ्या रद्द केल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केले होते. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत होते. संतोष भुतेकर यांना याबाबत माहिती होताच काल,१८ ऑक्टोबरला त्यांनी चिखली बसस्थानक गाठले. बसेस नसल्याने अनेक प्रवाशी ताटकळत उभे असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र संबधित अधिकाऱ्यांनी हात वर केल्याने संतप्त झालेल्या भुतेकर यांनी प्रवाशांना सोबत घेऊन एसटी महामंडळाच्या नावाने बोंबा मारल्या..या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. पहा व्हिडिओ..

<a href=https://youtube.com/embed/9gPcXz21gsY?autoplay=1&mute=1><img src=https://img.youtube.com/vi/9gPcXz21gsY/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">