“तुम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं आहात, पण तुमचा बाप संकटात असताना त्याची किडनी काढून घेणार का?” रविकांत तुपकरांचा फायनान्स कर्मचाऱ्यांना थेट सवाल!

मलकापुरातील सभेतच मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी घेतली भेट; तुपकरांनी निवेदन स्वीकारत स्पष्टच सांगितलं, “आमचं भांडण तुमच्याशी नाही, तुमच्या कंपन्यांशी आहे!”

 
मलकापूर (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा ) : “तुम्हीही आमच्या शेतकऱ्यांचीच पोरं आहात. पोट भरण्यासाठी नोकरी करता, हे आम्हाला समजतं. पण तुमचा बाप आज दुष्काळाने संकटात सापडला आहे. त्याच्या हातात पैसा नाही, शेतीत उत्पन्न नाही. मग अशा परिस्थितीत त्याची किडनी काढून घेणार का? आमचं भांडण तुमच्याशी नाही, तुमच्या कंपन्यांशी आहे. तुम्ही आमचे शत्रू नाहीत!” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांना समजावत सक्तीच्या कर्जवसुलीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, मलकापूर येथे दुष्काळ संघर्ष यात्रेच्या प्रारंभानिमित्त आयोजित सभेत तुपकरांचे आक्रमक भाषण संपताच मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी थेट त्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तुपकरांना दिले. तुपकरांनीही निवेदन स्वीकारत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे दुष्काळात कर्जवसुलीच्या प्रश्नावरून शेतकरी आणि मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.मलकापूर (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा ) : “तुम्हीही आमच्या शेतकऱ्यांचीच पोरं आहात. पोट भरण्यासाठी नोकरी करता, हे आम्हाला समजतं. पण तुमचा बाप आज दुष्काळाने संकटात सापडला आहे. त्याच्या हातात पैसा नाही, शेतीत उत्पन्न नाही. मग अशा परिस्थितीत त्याची किडनी काढून घेणार का? आमचं भांडण तुमच्याशी नाही, तुमच्या कंपन्यांशी आहे. तुम्ही आमचे शत्रू नाहीत!” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांना समजावत सक्तीच्या कर्जवसुलीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, मलकापूर येथे दुष्काळ संघर्ष यात्रेच्या प्रारंभानिमित्त आयोजित सभेत तुपकरांचे आक्रमक भाषण संपताच मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी थेट त्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तुपकरांना दिले. तुपकरांनीही निवेदन स्वीकारत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे दुष्काळात कर्जवसुलीच्या प्रश्नावरून शेतकरी आणि मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.मलकापूर (बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा ) : “तुम्हीही आमच्या शेतकऱ्यांचीच पोरं आहात. पोट भरण्यासाठी नोकरी करता, हे आम्हाला समजतं. पण तुमचा बाप आज दुष्काळाने संकटात सापडला आहे. त्याच्या हातात पैसा नाही, शेतीत उत्पन्न नाही. मग अशा परिस्थितीत त्याची किडनी काढून घेणार का? आमचं भांडण तुमच्याशी नाही, तुमच्या कंपन्यांशी आहे. तुम्ही आमचे शत्रू नाहीत!” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांना समजावत सक्तीच्या कर्जवसुलीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, मलकापूर येथे दुष्काळ संघर्ष यात्रेच्या प्रारंभानिमित्त आयोजित सभेत तुपकरांचे आक्रमक भाषण संपताच मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी थेट त्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तुपकरांना दिले. तुपकरांनीही निवेदन स्वीकारत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे दुष्काळात कर्जवसुलीच्या प्रश्नावरून शेतकरी आणि मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.

 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला आज, १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरुवात झाली. या निमित्ताने आयोजित सभेत तुपकरांनी मायक्रोफायनान्स कंपन्या, खासगी फायनान्स संस्था आणि बँकांकडून होत असलेल्या कथित सक्तीच्या कर्जवसुलीवर जोरदार टीका केली होती. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना त्यांच्या दारात जाऊन बसणे, अपमान करणे आणि जबरदस्तीने वसुली करणे थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला होता. याच सभेचे भाषण संपल्यानंतर मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या प्रतिनिधींनी तुपकरांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तुपकरांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेत आपला लढा कर्मचाऱ्यांविरोधात नसल्याचे स्पष्ट केले.

“तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचीच पोरं, तुमच्याशी आमचं वैर नाही!”

कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, “तुम्ही नोकरी करता, कारण तुम्हाला तुमचं कुटुंब चालवायचं आहे. कंपनी सांगते म्हणून तुम्हाला वसुलीसाठी जावं लागतं, हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्हीही शेतकऱ्यांचीच पोरं आहात. तुमचा बाप संकटात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या दारात बसून, त्याला त्रास देऊन वसुली करायची का? त्याची किडनी काढून घेणार का?”
“आमचं भांडण तुमच्याशी नाही. आमचं भांडण तुमच्या मालकांशी, कंपन्यांशी आहे. शेतकऱ्यांची पोरं असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही विरोधक मानत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.“तुमच्या मालकांना स्पष्ट सांगा, दुष्काळ आहे; जबरदस्ती वसुली करू नका!”यावेळी तुपकरांनी कर्मचाऱ्यांनाच कंपन्यांच्या व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती पोहोचवण्याचे आवाहन केले.

“तुम्ही तुमच्या मालकांना सांगा, यंदा दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. जो शेतकरी स्वतःहून कर्जाचा हप्ता भरायला तयार आहे, त्याच्याकडून पैसे घ्या. पण ज्याच्याकडे पैसेच नाहीत, त्याच्या दारात जाऊन बसू नका. त्याचा अपमान करू नका. जबरदस्तीने वसुली करू नका,” असे तुपकर म्हणाले.
इतकी वर्षे शेतकऱ्यांकडून कर्जाचे हप्ते वसूल करणाऱ्या कंपन्यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

“तुम्हीही सरकारशी भांडा, आम्हीही भांडतो; प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र लढू!”

मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही तुपकरांनी भूमिका मांडली. “तुम्हीही सरकारसोबत भांडा, आम्हीही सरकारसोबत भांडतो. तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो. पण शेतकऱ्यांना वेठीस धरून वसुली करू नका,” असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.कर्जवसुलीच्या प्रश्नावर सरकारने हस्तक्षेप करून फायनान्स कंपन्यांची बैठक घ्यावी, तडजोडीचा मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुपकरांनी  केली आहे.

आक्रमक भाषणानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद; तुपकरांच्या भूमिकेची चर्चा!

एकीकडे मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात आक्रमक इशारा आणि दुसरीकडे त्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी संवाद, असा प्रसंग मलकापूरच्या सभेत पाहायला मिळाला.कर्जवसुली करणारे कर्मचारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याऐवजी कंपन्यांच्या व्यवस्थापनाने आणि सरकारने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी भूमिका तुपकरांनी मांडली.