बाई माझ्या गं घरात घुसले पाणी..! चिखली रोडवरील नागरिकांच्या घरात लाखो लिटर पाणी घुसले, नेंमक काय झालं? वाचा...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय! चिखली रोडवरील राजश्री शाहू ग्रामीण पतसंस्थे समोर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात लाखो लिटर पाणी घुसले. यामागचे कारण म्हणजे, गेल्या ८ दिवसांपासून रस्त्यावरील पाईपलाईन फुटली आहे. हे पाणी फिल्टर झाल्याचे असून, नळाद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणारे पाणी आहे. दरम्यान, पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या घरात लाखो लिटर पाणी घुसले. इतकेच नाही करत, याबाबत नगरपालिकेला वेळोवेळी तक्रार देण्यात आली. असे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. आज १९ जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी सकाळी कामाला सुरुवात केली असल्याचे दिसून आले. सध्याही पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे.
   
 पाणीपुरवठा अधिकारी म्हणाले!
 यासंदर्भात बुलडाणा लाइव्हने नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री गायकवाड यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, आठ दिवसांपासून ही पाईपलाईन फुटली असल्याचे खरे आहे. परंतु, शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य पाईपलाईन असल्याने, शहरातील सर्व प्रभागातील नळ केंद्र बंद करावे लागतात. आणि पावसाचे ही वातावरण असल्याने काम करता आले नाही. परंतु आज सकाळीच कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. असे ते म्हणाले.