पैशांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ! 'दुसरे लग्न कर' म्हणत धमकावले, शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी.. 

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील ३६ वर्षीय महिलेचा तिच्या सासरच्या मंडळींनी छळ केला. काल ११ जून रोजी हा प्रकार समोर आला आहे. पिडीत विवाहितीने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या ७ जणांविरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
   घटना २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान घडली. पती नामदेव याने कार घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून घेऊन ये असे पिडीतेला सांगितले होते. यानंतर या कारणावरून वेळोवेळी तिला मारझोड करण्यात आली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत पिडीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. 'दुसरे लग्न कर ' असे देखील सासरचे काही लोक पिडीतेला उद्देशून म्हणाले. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पिडीता वैतागली. दरम्यान काल ११ जून रोजी बोराखेडी पोलीस ठाणे गाठून पतीसह सासरच्या सात जणां विरोधात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल खराडे, प्रमोद साळोख हे करत आहेत.