बहिणीच्या लग्नाला आला नाही म्हणून असं करत का? बुलडाण्यात डेंजर घडलं....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बहिणीच्या लग्नाला आला नाही या कारणावरून वाद घालत, एकाला मारहाण झाल्याची घटना काल २६ जुलैच्या रात्री शहरातील टिपू सुलतान चौकात घडली. 
शहर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीत मोहम्मद समीर अब्दुल मजीद यांनी म्हटले आहे की, सय्यद कासिफ सय्यद असिफ हा त्यांचा मित्र आहे. त्याच्या बहिणीच्या लग्नाला गेलो नाही म्हणून सय्यद कासिफ हा नेहमी वाद घालत असतो. दरम्यान, काल रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मोहम्मद समीर हे घरी जात असताना सय्यद कासिफ सय्यद आसिफ हा टिपू सुलतान चौकामध्ये भेटला.
माझ्या बहिणीच्या लग्नाला का आला नाही ? असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. एवढेच नाही तर फायटरने डोक्यात वार केले. उजव्या गालावर, छातीवर मारहाण करून जखमी केले. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद कासिफ सय्यद आसिफ रा. जोहर नगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.