जिल्ह्यातील ४६ गावात पाण्यासाठी वणवण; तब्बल दीड लाख लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा ! 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यातील ४६ गावांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे असल्याचे भीषण चित्र आहे. एकूण दीड लाख जिल्हावासी टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ४६ गावात ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. 

 १६८ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवल्या जात आहे. यामध्ये आणखी वाढ होवू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. बुलढाणा तालुक्यातील १२ तर देऊळगाव राजा तालुक्यातील ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. चिखली तालुक्यातील १० गावांना तर , मेहकर मधील ९ तर मोताळ्यातील ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. तब्बल १ लाख ४४ हजार ६४० लोकांची तहान टँकरवर अवलंबून गेली आहे. शिवाय अनेक ठिकाणची जलाशयात पाणी पातळी घसरली असल्याचे दिसून आले आहे.