राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या माध्यमातून शेतकऱ्याला ४९ हजारांचा पशुधन विम्याचा लाभ..
May 23, 2025, 21:37 IST
अंढेरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा येथील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी गजानन तेजनकर यांना गायीच्या मृत्यूनंतर युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत ४९ हजार रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला. हा धनादेश त्यांना राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रदान करण्यात आला.
श्री. तेजनकर यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अंढेरा शाखेतून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. याचवेळी त्यांनी जनावरासाठी विमा काढला होता. अलीकडेच त्यांच्या गायीचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर सादर केलेल्या दाव्यावर युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने ४९ हजार रुपयांची रक्कम मंजूर केली.
धनादेशाचे वितरण राजर्षी शाहू मल्टीस्टेट मेहकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले व अंढेरा शाखेचे व्यवस्थापक समाधान तेजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके आणि सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि दुग्ध व्यवसायासाठी सहाय्य दिले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.