येळगाव शिवारात चोरी; विहिरीतील पाण्याची मोटर केबल लंपास! ऐन पेरणीच्या दिवसात शेतकरी समस्येच्या गर्तेत! 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ऐन पेरणी पाण्याच्या दिवसांमध्ये शेती साहित्य लंपास होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यामुळे शेतकरी समस्येच्या गर्तेत आढळत आहेत. येळगाव शिवारातील शेतात विहिरीमधील मोटर केबल चोरी झाल्याची घटना काल १२ जून रोजी समोर आली. दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 
     
     प्राप्त माहितीनुसार, येळगाव शिवारात गट क्र. ४०१ मध्ये सुमंता इंगळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. शेतीला लागूनच बेळगाव धरणाचे फिल्टर प्लांट आहे. दरम्यान, २९ मे रोजी शेताच्या विहिरीमधील पाण्यातील मोटरची १२० फुट केबल (किंमत ३७३०) चोरीला गेली. तसेच १२ जून रोजी पुन्हा एकदा शेतातून २२० फुट केबल वायर (किंमत ६७८०) चोरी गेल्याचे समजले. कोणी तरी अज्ञात चोरट्याने शेतातील मोटर केबल चे साहित्य चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत. ऐन पेरणीच्या लगबगीत असताना शेतकऱ्यांची शेती साहित्य चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत. चिखली तालुक्यात देखील शेती साहित्य चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.