आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त! आमदार श्वेताताई महालेंचे प्रतिपादन; निमित्त युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय संस्कृती व आध्यात्माच्या प्रचार प्रसारातून संपूर्ण जगातील मानव जातीला समृद्ध जीवन जगण्याचा संदेश देणारे श्री श्री रवी शंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य हे संपूर्ण मानव जातीसाठी उपयुक्त असल्याचे मत आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. दि. ८ ऑक्टोबर रोजी स्थानिक श्री मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी आपले विचार व्यक्त केले. या भेटीदरम्यान त्यांनी शिबीरार्थी युवक - युवतीशी संवाद देखील साधला.
गेल्या ४२ वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात जगातील १५६ देशांमध्ये सुरू आहे, या कार्याशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला असून त्यामुळे युवकांच्या आयुष्याला एक विधायक दिशा प्राप्त झाल्याचे मत आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे सुरू असलेल्या या रचनात्मक कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तत्पर असअसल्याची ग्वाही आ. महाले यांनी यावेळी दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे रमेश पुंडकर, गणेश तोमझरे, सुनील सोळंकी, कुणाल रांधे,धवल पोपट, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, सुभाषअप्पा झगडे, धवल पोपट, मयूर अग्रवाल, सिद्धेश्वर इंगळे या वेळी उपस्थित होते.