जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरावी! जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याची विविध स्तरांतून मागणी.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा सामान्य व स्त्री रुग्णालयातील रिक्त पदांची पूर्तता नसल्याने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने येथील रिक्त पदे भरावी तसेच जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी जिल्ह्यातील विविध स्तरांतून केली जात आहे .
 अन्न वस्त्र, निवारा, शिक्षण, तसेच आरोग्य या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. नागरिकांना चांगले आयुष्य जगण्यासाठी हे पाचही घटक अत्यावश्यक असताना जिल्हा सामान्य व स्त्री रुग्णालयातील शेकडो पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत. अनेकदा आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे दिसून आले आहे, यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरून जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध स्तरांतून केल्या जात आहे. शिवाय याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांनी दिला आहे.