"संघ गंगा के तीन भगीरथ"! बुलडाण्यात आज नाटिकेचे आयोजन! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "संघ गंगा के तीन भगीरथ" या नाटिकेचे आयोजन आज ,२३ जूनला बुलढाण्यात करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता बुलढाणा अर्बन मुख्यालयासमोरील गोवर्धन सभागृहात नागपूर येथील ३० कलाकारांचा संच ही नाटिका प्रस्तुत करणार आहे. 

 

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने संघाच्या पहिल्या ३ पूजनीय सरसंघचालकांच्या जीवनावर आधारित "संघ गंगा के तीन भगीरथ " या नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाणा च्या वतीने या नाटिकेचे आयोजन करण्यात आले असून, प्रवेश नि:शुल्क आहे. या नाटकेसाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..