बुलडाण्यात चोरट्यांनी हद्दच केली! धाड नाक्यावरच्या किराणा दुकानसमोरून तेलाच्या टाक्या चोरल्या! सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले चोरटे; बातमीत वाचा कोण आहे चोर....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात दीपक कोथळकर यांच्या किराणा दुकानासमोरील ३ तेलाच्या टाक्या (एकुण किंमत ४५००) चोरी झाल्या .काल २९ डिसेंबरच्या सकाळी ही बाब उघडकीस आली. दरम्यान दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्या नंतर मध्यरात्री चोरी करताना चोरटे दिसून आले. त्यावरून सुरेश कुळसुंदर यासह अन्य ४ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 २९ डिसेंबरला पहाटे ३ वाजेच्या वेळी धांडे ले आऊट परिसरात राहणारा सुरेश कुळसुंदर त्याच्या सहकाऱ्यांसह कोथळकर यांच्या दुकानासमोर आला. त्यांनतर त्याठीकाणच्या तेलाच्या तीन टाक्या त्यांनी मोटारसायकल वर ठेवून फरार झाले.दुकानदार दुकानावरील माळ्यावरच राहतात, सकाळी जेव्हा दुकानाचे मालक दीपक कोथळकर यांचे वडील दुकानासमोर आले तेव्हा त्यांना टाक्या दिसल्या नाही. लगेचच त्यांनी ही बाब दीपक यांना सांगितली. त्यांनतर दुकानाचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मग टाक्यांची चोरी करताना परिसरातीलच सुरेश कुळसुंदर दिसून आला. त्याच्यासह त्याचे ४ अन्य सहकारी देखील होते. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.