सेविकांना मानधन वाढीची एकच "आशा"! 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने! म्हणाल्या, मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत.. 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मानधनात वाढ होण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज २४ जानेवारीला जिल्हा मुख्यालयी शेकडो कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली, तसेच धरणे आंदोलनाने लक्ष वेधले. 
आशा कर्मचाऱ्यांना ७ हजार व गटप्रवर्तकांना १० हजार रुपये इतके मानधन देण्यात यावे. यासह विविध मांगण्या कर्मचाऱ्यांनी विषद केल्या. सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा २९ जानेवारीला मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आशा सेविका व गटप्रवर्तकांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सर्व कर्मचारी मानधन वाढीची आशा धरून आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले.