BREAKING चुलीत गेले नेते.. चुलीत गेले पक्ष....सोयाबीन , कपासाच्या भावासाठी देऊळगाव घुबे वासियांचा निर्धार! मंत्री, खासदार आमदारांना गावात बंदी....

 
देऊळगाव घुबे(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे चे शेतकरी आक्रमक झाले आहेत.. शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या या गावाने मंत्री ,आमदार, खासदारांना गावबंदी केली आहे..तसे पोस्टरच गावात लावण्यात आले आहे. सोयाबीन , कापूस, तुरीचे भाव अर्ध्यावर आले तरी कोणताही नेता शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही म्हणून वैतागून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय...
                     जाहिरात 👆
सोयाबीन, कापूस, तुरीचे भाव अर्ध्यावर आले आहेत. यंदा आधीच दुष्काळाने शेतकरी संकटात आहे, उत्पादनात घट झाली आहे. मात्र असे असताना संसदेत आणि विधानभवनात कोणत्याही नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही..त्यामुळे शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचे काम करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करीत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, शेतमालाला भाव हेच एक लक्ष असे लिहिलेले बॅनर गावात लावून राजकारण्यांना गावबंदी करण्यात आली आहे..