लोणार नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला; नंदकिशोर मापारी यांची यशस्वी मध्यस्थी;
चार दिवसांपासून शहरातील बंद घंटा गाड्या पुन्हा धावनार....
Oct 15, 2024, 09:28 IST
लोणार (प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार नगर पालिकेच्या घंटा गाड्या वरील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्या पासून थकित होते. वारंवार मागणी करून देखील वेतन मिळाले नसल्याने शहरातील कचरा संकलीत करणाऱ्या घंटा गड्यांची चाके चार दिवसांपासून थांबली होती. शहरात ऐन सणासुदीच्या सुदीच्या काळात घाणीचे साम्रज्य पसरले होते. अखेर हा विषय मार्गी लागला आहे. शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी स्थानिक नगर पालिकेच्या मुख्याधिकारी विभा वराडे यांच्या दालनात बसून घंटा गड्यावरील चालकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच शहरातील बंदावस्थेत असलेल्या हायमस्ट लाईट लवकर सुरु करण्याची मागणी केली.
यावेळी मुख्याधिकारी वराडे यानी तात्काळ कचरा संकलीत करणाऱ्या घंटा गाड्या वरील चालकांच्या प्रलंबित वेतनाच्या देयकावर स्वाक्षरी करून त्यांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला. यामुळे शहरातील कचरा संकलीत करणाऱ्या गाड्यांची गेल्या चार दिवसापासून थांबबलेली चाके पुन्हा धावणार आहे. यावेळी कचरा संकलीत करणाऱ्या घंटा गाड्यावरील सर्व चालक उपस्थित होते.
यावेळी आरोग्य निरीक्षक साळवे,सह बांधकाम अभीयंता कुलकर्णी, पाणीपुरवठा अधीक्षक संजय एनेवार, उपस्थित होते.