"बुलडाणा लाइव्ह"चा इम्पॅक्ट...
जिल्हा परिषदेच्या
आरोग्य विभागातील दोन विकेट पडल्या; मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरातांचा आदेश, दोघा कलेक्ट–करांच्या दुसऱ्या विभागात बदल्या...
Sep 16, 2025, 19:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "त्या" मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवला होता हिसका! गुलाबराव खरात तशी कारवाई करतील का? वर्षानुवर्षे एकाच टेबलाला चिकटलेल्या गोचिडांवर कारवाई काय?" या मथळ्याखाली आज १६ सप्टेंबरला बुलडाणा लाइव्ह ने बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चांगलीच गाजली अन् त्याचा इम्पॅक्ट ही चांगलाच वाजला.. दुपारपासूनच या संबंधातील सूत्रे हलायला सुरुवात झाली होती..अखेर सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कारवाईवर शिक्कामोर्तब केले आणि पवार आणि हिवाळे नामक आरोग्य विभागातील दोन वरिष्ठ सहाय्यकांच्या बदल्यांचे आदेश निघाले..
षण्मुखराजन मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आरोग्य विभागातील हिवाळे आणि ताठे या दोघांवर त्यांनी कारवाई केली होती. त्यावेळीही अशाच पद्धतीचे संकलन त्या दोघांकडून जिल्हाभरात सुरू होते.ताठे याचे निलंबन तर पवार याला ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पवार यांच्याकडून तो टेबल मिळवण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आले होते..तो टेबल अति प्रिय असल्याने भाग्यश्री विसपुते यांच्या कार्यकाळात मोठी तडजोड करून पुन्हा तो टेबल मिळवला होता.
त्यानंतर पुन्हा जोरात संकलन सुरू होते.. "बुलडाणा लाइव्ह" ने याबाबतीत सत्य उजेडात आणल्यानंतर जिल्हाभरातून बुलडाणा लाइव्ह चे कौतुक होत होते. ज्यांच्या ज्यांच्याकडून त्या दोघांनी वसुली केली होती त्यांनी तर एकेक किस्से बुलडाणा लाइव्हला कळवले..अखेर घडा भरला... जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पवार आणि हिवाळे या दोघांची सामान्य प्रशासन विभागात बदली केली आहे. आता राहिला विषय त्यांच्या बॉसचा..त्यावर देखील वरिष्ठ पातळीवरून कडक ॲक्शन घेण्यात येणार असल्याचे कळते...