अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी बसताेय आर्थिक भुर्दंड !
सेतु सेवा केंद्र संचानकांकडून ई केवायसीसाठी ५० रुपये शुल्क; शेतकऱ्यांनी पैसे देवू नये, तहसीलदारांचे आवाहन !

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :मेहकर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तालुक्यातील ६८ हजपर ५८ शेतकऱ्यांना शासनाने मदत वितरीत केली आहे. ही मदत खात्यात जमा हाेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसीसाठी सेतु केंद्र संचालक ५० रुपये घेत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 
मेहकर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत मिळायला सुरुवात झाली असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याला खात्याचे प्रमाणीकरण करणे गरजेचे बनले आहे. मात्र, ई केवायसी करून देणाऱ्या सेतु संचालकांकडून पन्नास रुपये शुल्क आकारल्या जात असल्याचे समोर आले आहे. नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणे गरजेचे झाले असून, ई- केवायसी करून देणाऱ्यांना पैसे देवू नका असे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे. मेहकर तालुक्यात २५ व
२६ जून रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये शेती खरडून जाणे, शेतीमध्ये गाळ बसणे व पिकाचे नुकसान होणे अशा प्रकारेतालुक्यातील ६८ हजार ५८ शेतकऱ्यांचे ६५ हजार ६०१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते.
ई केवायसीसाठी शेतकऱ्यांच्या लागताहेत रांगा 
ज्याची मदत म्हणून ६ ऑगस्ट रोजी मदत जाहीर केली असता मदत मिळण्यासाठी आधार नुसार खात्याचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. यामुळे, ६८ हजार ५८ शेतकऱ्यांना खात्याचे ई केवायसी करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर तसेच आपले सरकार केंद्रावर ई- केवायसीसाठी रांगा लावल्या. याठिकाणी ओळखीचे असेल तर तीस रुपये नाहीतर पन्नास रुपये असे शुल्क आकारले जात असल्याचे दिसून येत आहे
सेतु केंद्र संचालकांना शासनाकडून केवायसी करून देण्याचे पैसे मिळणार आहेत. तेव्हा कोणत्याही शेतकऱ्याकडून सेतू चालकांनी पैसे घेतले असल्यास त्यासंबंधी तक्रार करा.
नीलेश मडके, तहसीलदार, मेहकर