आग लागलेल्या वनराईची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटलांकडून पाहणी! वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर खवळले; फोटो, व्हिडीओ काढण्यास केला मज्जाव....

 
 
Advt. 👆
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार येथील दुर्गा टेकडी परिसरात असलेल्या वनराईला आज दुपारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. या आगीत शेकडोंच्या संख्येत वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले. अनेक वन्यजीवांची हानी झाली. दरम्यान आज,सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आग लागलेल्या वनराईची पाहणी केली. दरम्यान यावेळी घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जिल्हाधिकारी पाटील खवळले. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना फोटो व्हिडिओ काढण्यास कलेक्टरांनी मज्जाव केला. दरम्यान जोपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात येत नाही तोपर्यंत परिसर न सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत..
 
लोणार येथे आज जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा प्रवास होता. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दुर्गा टेकडी परिसराकडे जाणारा रस्त्यावर साफसफाई करून कचरा जाळला. जळता कचरा तसाच ठेवून कर्मचारी तिथून निघून गेले. तीच आग पुढे वनराई परिसरात पसरली त्यामुळे मोठ्या संख्येत वनसंपदेचे नुकसान झाले. शेकडो पक्षांची घरटी आगीच्या भक्षस्थानी पडली. काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाला. आग विझवण्यास देखील लोणार नगरपालिकेकडून विलंब झाला. रिसोड नगरपालिकेने देखील आपले अग्निशामक दल आग विझवण्यासाठी पाठवले होते.
Related img.

 

स्थानिक वन्यजीव प्रेमींनी देखील खाजगी टँकर लावून आग विझवण्याचा ऑटोकाठ प्रयत्न केला. दरम्यान सायंकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आग लागलेल्या वनराई परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांस फोटो व्हिडिओ काढण्यास मज्जाव केला..जिल्हाधिकारी डॉ.पाटील किरण पाटील पत्रकारांवर दमदाटी करतांना दिसले. दरम्यान जोपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात येत नाही तोपर्यंत परिसर सोडू नका असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत..