गाडी फोडली हे कमी झालं... सदावर्तेला संपवायला पाहिजे होत, मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता! आमदार संजय गायकाडांचे विधान; नेत्यांना गावबंदीच्या मुद्द्यावर म्हणाले...
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आक्रमक वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात, मग ते फडणवीस विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांच्या त्यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याचे विधान असो वा आमदार कुटेंना बुलडाण्यात ५० फुट अंतरावर येऊन दाखवण्याचे चॅलेंज असो...आता पुन्हा आमदार गायकवाडांचे आक्रमक विधान चर्चेत आले आहे. मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली यावर पत्रकारांनी आमदार गायकवाड यांना प्रतिक्रिया विचारली असता " गाडी फोडली हे कमी झालं सदावर्तेला संपवायला पाहिजे होत.." अस विधान गायकवाड यांनी केलं. गायकवाड यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सत्तेत असताना आमदारांच्या तोंडी चिथावणी निर्माण करणारे वक्तव्य बरोबर नाही, संयमाने घेतल पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
"गुणरत्न सदावर्तेमुळ महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच आरक्षण हटवल्या गेलं. त्याने प्रखरपणे आरक्षणाच्या विरोधात कोर्टात बाजू मांडली, तो सुडाने पेटलेला होता, जस काही त्याच प्रचंड मोठं नुकसान होणार होत..त्यामुळे गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे, त्याला संपवायला पाहिजे होत..हा संपला असता तर मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता..हे ज्यान कुणी केलं त्याला मी सांगतो की बाबा हे कमी झालं..याची व्यवस्था जरा चांगली करायला पाहिजे होती.." अस आमदार संजय गायकवाड म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी काही गावांत नेत्यांना गावबंदी केल्याबद्दल आमदार गायकवाड यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की," मनोज जरांगे यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. जरांगे यांनी शांततेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.असे असताना काही गावच्या उत्साही कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या गावबंदीची भूमिका घेतली आहे, अशी भूमिका घेऊ नये. दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. यात समितीचा अहवाल येणे यात काही वेळ चाललाय पण तो आरक्षण टिकाव म्हणून चाललाय..घाईघाईत आरक्षण दिलं अन् ते पुन्हा उडल तर समाजाचं खूप मोठं नुकसान होईल,त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. मी एकनाथ शिंदेंना चांगल ओळखतो,तो माणूस जीवावर खेळेल पण शब्द पाळेल,प्राण जाये पर वचन न जाए असं त्यांचं काम आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा." अस आमदार गायकवाड म्हणाले.