दंगलीतल्या आरोपीची दादागिरी..! म्हणे,पोलिसांना नाव का सांगितले? नांदुऱ्यात काय घडलं?

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पोलीसांना नाव सांगीतल्याचे कारणावरून चौघा जणांनी एकास लोखंडी पाईपने जबर मारहाण केली केल्याची घटना नांदुरा शहरातील घासमंडी चौक परिसरात घडली. नादुरा पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे 

 मागील वर्षी नांदुरा शहरात दंगल झाली होती. या दंगलीत पोलीसांना तु माझे नाव का सांगितले असे म्हणत ताज नगर येथील शेख अन्सार शेख मुख्तार वय ३८ याला त्याच्याच मोहल्ल्यातील शेख आसीफ शेख हारुन याने शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यानंतर शेख आसीफ याने त्याच्या जवळील चाकु काढून शेख अन्सार याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शेख रहीम शेख नदिम याने त्याला पकडले. तर शेख हारुण शेख चांद, शेख बुडु शेख हारुण व शेख अफजल शेख बुड्डु या तिघांनी सुद्धा शेख अन्सार याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर नांदुरा पोलिसांनी चौघाही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केले आहे.