Big breaking आंदोलन चिरडले! बुलढाण्यात पोहोचण्याआधीच पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी चिखली पोलिसांच्या गराड्यात! बुलढाण्यात संजय गायकवाड मुर्दाबादच्या घोषणा...
आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी फरफटत उचलले...
Apr 28, 2026, 12:40 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अखेर बुलढाणा पोलिसांनी आंदोलन दडपले. "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना चिखलीतच पोलिसांनी अडवले. दुसरीकडे प्रकाश आंबी यांची वाट पाहत असलेल्या बुलढाण्यातील आंदोलकांना देखील संधी साधून पोलिसांनी अक्षरशा फरफटत ताब्यात घेतले. आमदार गायकवाड यांनी "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवील, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही.."अशा पद्धतीचे इशारे दिले होते..त्यामुळे वातावरण अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांना कारवाई करावी लागली..
प्रकाशक प्रकाश आंबी सध्या चिखलीतील हॉटेल अमृततुल्य मध्ये असून चिखली पोलिसांचा गराडा त्यांच्या भोवती आहे. बुलढाण्यात आंदोलक प्रकाश आंबी यांची वाट पाहत होते, आंबी यांना बुलढाण्यात येऊ देत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही अशा इशाराही आक्रमक आंदोलकांनी देत संजय गायकवाड मुर्दाबाद अशा घोषणा सुरू केल्या होत्या. वातावरण अधिक चिघळू होऊ नये म्हणून आता पोलिसांनी बाळाचा वापर करीत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे..