जय मातृभूमी गणेशोत्सवात "नादब्रह्म" चे आकर्षण; ढोल ताशा पथक आणि ध्वज पथक सज्ज; लाईट शो आणि आतषबाजी फेडणार डोळ्यांचे पारणे !

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, बुधवारपासून सुरू होत आहे. बुलढाण्यातही जय मातृभूमी सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष यशवर्धन सपकाल यांच्या नेतृत्वत आपल्या गणरायाचा हा उत्सव उत्साहाने साजरा करण्याची जोरदार तयारी चालवली आहे. 
नाद प्रतिष्ठानचे ढोल ताशा पथक आणि ध्वज पथक त्यासाठी सज्ज असून गणपती बाप्पाचा स्वागत करण्यासाठी तरुणाईची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 
गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ढोल-ताशाच्या गजराता बाप्पाचे स्वागत केले जाते. आपल्या लाडका बाप्पांचे स्वागत करण्यासाठी जय मातृभूमी सांस्कृतिक समिती गेल्या पंधरा दिवसांपासून परिश्रम घेत आहे. चिंचोले चौक ,सर्कुलर रोड ,बुलडाना परिसरात मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहेत. आज बापाच्या आगमनासाठी हाच नादब्रह्म च्या आकर्षण असून त्या माध्यमातून ढोल आणि ध्वज पथक आपले कौशल्य दाखवणार आहे. सोबतच सायंकाळी लाईट शो आणि आताश बाजी देखील केली जाणार आहे.