चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपशावर प्रशासनाची करडी नजर! जलस्रोतांच्या सुरक्षेसाठी भरारी पथके सक्रिय; नियमभंग करणाऱ्यांवर पंप जप्तीसह कडक कारवाई...

 

 या पथकांमध्ये मृद व जलसंधारण विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके तालुक्यातील विविध जलप्रकल्पांची नियमित

तसेच अचानक तपासणी करणार आहेत.

पंप जप्त, वीज कनेक्शन कट; गुन्हाही दाखल होणार!

तपासणीदरम्यान अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ तसेच केंद्रीय विद्युत कायदा, २००३ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

यामध्ये पंप संच जप्त करणे, दंड आकारणे, वीजपुरवठा खंडित करणे आणि आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे जलस्रोतांमधून नियमबाह्य पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नागरिक आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही जलस्रोतामधून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करू नये. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चिखली तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.