इसरुळ देऊळगाव घूबे रस्त्यावरील 'ते' झाड ठरले धोकादायक! 

 
देऊळगाव घुबे (ऋषी भोपळे :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) इसरुळ देऊळगाव घुबे रस्त्यालगत असलेले एक टांगते झाड अपघातासाठी धोकादायक ठरले आहे. मागील दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाड रस्त्याला झोकल्या गेले. उन्मळलेले झाड वाहतुकीसाठी अडथळा बनले असून नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे त्या झाडाचा योग्य बंदोबस्त लावला व परिसरातील ग्रामस्थांचा प्रवास सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, इसरुळ देऊळगाव घुबे मार्गे चिखली जाण्यासाठी हा महत्वाचा रोड आहे. गवखेड्यातील लोकांना नेहमीच या रस्त्याने जावे लागते. परंतु रस्त्यालगत उन्मळून पडलेल्या झाडापासून धोका निर्माण झाला आहे. यामुळे अपघात नाकारत येत नाही. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सदर रस्त्यावरील उन्मळलेले झाड त्वरित काढून टाकण्यात यावे. व गावकऱ्यांचा मार्ग सुरळीत करावा अशी मागणी इसरुळ सरपंच सतीश भुतेकर यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.