आतंकवाद्यांना धर्म असतोच! इस्लामी दहशतवाद! आ.संजय गायकवाड स्पष्टच बोलले! म्हणाले,त्यांनी २६ मारले त्यांचे २६० मारा! नाहीतर उद्या प्रत्येक गल्लीत हिंदू कोण? विचारत गोळ्या झाडणारे उभे राहतील...
Apr 24, 2025, 10:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आतंकवाद्यांचा धर्म असतो इस्लामी दहशतवाद. या सच्चाई ला नकार देणं म्हणजे आपल्या भवितव्याला गोंजारण..असे स्पष्ट बोलत त्यांनी आपले २६ मारले आपण त्यांच्या घरात घुसून त्यांचे २६० मारा अशी मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. काल,२३ जानेवारीला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आतंकवाद्यांनी निर्दोष हिंदूंवर गोळ्या झाडून त्यांच्या जीवावर उठण्याचं कृत्य केलं. मागील ४० वर्षांपासून हे भस्मासुर भारतमातेला जखमी करत आहेत. कधी घरात घुसून, कधी रस्त्यात अडवून, तर कधी केवळ कुंकू पाहून आमच्या मातां-भगिनींवर बलात्कार करून त्यांना मारण्यात आलं. हे काय मानवीय लढे आहेत का? हा युद्धाचा नियम आहे का? नाही! हा एकच धर्म असलेल्या दहशतवाद्यांचा योजनाबद्ध संहार आहे, आणि हे आपण आता थांबवलं नाही, तर उद्या प्रत्येक गल्लीत 'हिंदू कोण?' हे विचारत गोळ्या झाडणारे उभे राहतील.. असा संतापजनक उद्वेग त्यांनी काढले.त्यांनी २६ भारतीयांना मारले असून.. आता त्यांच्या घरात घुसून त्यांचे २६० मारा, असे आवाहन त्यांनी केले
पुढे बोलतांना आ. गायकवाड म्हणाले की,या आतंकवाद्यांचा धर्म असतो.. इस्लामी दहशतवाद ! आज या सच्चाईला नकार देणं म्हणजे आपल्या भवितव्याला गोंजारणं. पाकिस्तानने भारताशी दोन वेळा युद्ध हरल्यानंतर आपला पराभव पत्करला नाही, तर या भाडोत्री इस्लामिक कट्टरपंथ्यांना तयार केलं. त्यांनी काश्मिरी पंडितांवर अत्याचार केले, त्यांच्या घरांवर कब्जा केला, त्यांना देशातच निर्वासित केलं. आणि आम्ही, १३० कोटी भारतीय, केवळ सहन करत बसलो आहोत. पण मी सांगतो.. आता बस, पुरे झालं! आता सरकारने वेळ घालवायची नाही. कठोर निर्णय घ्यावेच लागतील. एकदाच, ठामपणे, संपूर्ण भारताने दहशतवादाच्या विरोधात निर्णायक युद्ध पुकारलं पाहिजे. या भ्याड हल्ल्यांवर भाषणं, ट्वीट्स किंवा निषेध करून काहीच साध्य होणार नाही. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा बंध सैल झाला आहे हे मान्य करून, अतिरेकी मानसिकतेच्या मुळावर वार करणं गरजेचं आहे. हिंदूंना सतत शांतीचा उपदेश करणाऱ्या भेकडांना एवढंच सांगतो.. जर आमच्यावर वार होणार असेल, तर आम्ही फुलं नाही फेकणार.. शत्रूचं समूळ उच्चाटनच आमचा पर्याय असेल. मी, या हिंदुस्थानच्या भूमीचा निष्ठावान सेवक, जबाबदारीने आणि ठामपणे सांगत.. मी या लढाईत हिंदू समाजाच्या प्रत्येक सैनिकासोबत आहे. हे युद्ध आता फक्त सीमेवर नको, तर मनामनात पेटायला हवं. काश्मीर केवळ एक भूप्रदेश नाही, तो आमच्या आत्म्याचा तुकडा आहे. त्याचं रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि आता वेळ आली आहे... ठरवलेलं तुफानी करायची आणि एकदाच इतिहास घडवायची.. असे शेवटी आ. संजय गायकवाड म्हणाले.