पहलगाम येथील दहशतवादी हला! जिल्हा प्रशासन अलर्ट; जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन

 
 बुलडाणा, (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पहलगाम, जम्मू व काश्मीर येथील पर्यटकावर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन सेवेसाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 
पहलगाम, जम्मू व काश्मीर येथील पर्यटकावर दहशतवादी हल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील काही व्यक्ती, आपले नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या दुरध्वनी क्रमांकावर किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. 
संपर्क क्रमांक याप्रमाणे :
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा 
फोन नं. 07262242683 
मो.नं. 7020435954 
ई-मेल - rdc_buldhana@rediffmail.com
जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक : 07262-242400