प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस.टी. कामगारांचे विभागीय कार्यालयासमोर उपोषण!
Feb 13, 2024, 15:56 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :वेतन वाढीसह अन्य प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस. टी. कामगार संगटनेने आज १३ फेब्रुवारीला बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. येथील मलकापूर रोडवरील विभागीय कार्यालयासमोर कामगार उपोषणास बसले आहेत.
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करावे, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याच्या अडचणी दूर करा, अशा प्रकारच्या अनेक आर्थिक मागण्या संगटनेने मांडल्या आहेत. शासनाने सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करावा असे कामगार कर्मचाऱ्यांनी सांगितले.