भरधाव दुचाकीची रोहीला धडक, दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यू! मेहकर तालुक्यातील घटना.. 

 
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर पासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गवढाळा फट्यानजीक भरधाव दुचाकीने रोहीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यादुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  
  प्राप्त माहितीनुसार, दुचाकीस्वार संतोष भिमसिंग राठोड (रा. पारखेड ता. मेहकर) वय अंदाजे ४२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. ते सकाळी किराणा घेण्यासाठी मेहकर येथे निघाले होते. दरम्यान, गवढळा ते भालेगाव रस्त्यामधोमध समोरून रोही धडकल्याने भीषण अपघात घडला. याधडकेत संतोष राठोड हे बाजूला फेकल्या गेलेत. त्यावेळी परिसरातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनी जवळ जावून पाहले असता, मृतक राठोड हे गंभीर जखमी अस्वतेथ दिसले. त्यांना नाव व गाव विचारले असता त्यांनी सांगितले परंतु त्यांनतर काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली.