सामाजिक वनीकरणाच्या झाडाची कत्तल! महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत; शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा चा  जोगवा 

 

मेहकर  (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम विज कंपनी कडुन होत आहे.पण हे होत असतांना झाड तोडून टाकण्याचा अक्षंम्य प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभाग महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्यांचे लक्ष लागून आहे.

जानेफळ पासुन मारोतीपेठ पर्यंत या मार्गाच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाकडुन दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. शासन यावर लाखो रूपये खर्च करते. पण लागवड करित असतांना अधिकाऱ्यांकडून अनेक चुका होतात.त्या चुका भविष्यात पर्यावरणाला घातक ठरतात. या मार्गावर अंदाजे ६ ते ७ वर्षापुर्वी गुलमोहर या झाडांची लागवड केली. भविष्यात झाडाची होणारी वाढ आणि फांद्याच्या विस्ताराचा विचार न करता लागवड अधिकाऱ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. त्या झाडांची लागवड त्यावेळी महावितरण च्या दोन खांब्यावरिल तारे खाली झाली. सामाजिक वनीकरणाकडुन झाडे जगवल्या गेली .माञ यावर्षी त्या झाडांच्या फांद्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे विज पुरवठा खंडित होऊ लागला.यामुळे फांद्या तोडण्याचे काम महावितरण करून राबविण्यात आले. पण त्या झाडांच्या फांद्या न तोडता झाडांची कत्तल करण्यात आली. यामुळे अंदाजे ६ ते ७ वर्षाची फुलांनी बहरलेली झाडे तोडल्यागेली. यामुळे शासनाचा वृक्ष लागवडीच्या उद्देशाला हरताळ फासल्या गेला.  विज पुरवठा अखंड राहावा हा हेतु महावितरण चा असला तरी फांद्या तोडून अडचण कमी झाली असती.असा सुर उमटत आहे. यामुळे विजेच्या तारे खाली वृक्ष लागवड करणे ही चुक आहे कि अखंड विज पुरवठा करण्यासाठी झाडांची कत्तल करणे ही चुक आहे.  यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते याकडे जानेफळसह परिसरातील नागरिक चर्चा करित आहे.