साहेब माझी किडनी घ्या पण किचकट अटी काढून कर्जमाफी करा...! मोताळ्यात युवा शेतकऱ्याचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...चक्क स्टँप पेपरवर लिहून दिले..

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केले. मात्र या कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती अतिशय किचकट असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतो आहे. अटी आणि शर्ती शिथिल करण्याची मागणी शेतकरी वर्गातून समोर येत आहे, याच मागणीसाठी मोताव्यातल्या एका युवा शेतकऱ्याने चक्क "माझी किडनी घ्या पण कर्जमाफी करा" अशा आशयाचे निवेदन देत अनोखे आंदोलन केले आहे. 

शुभम घोंगटे नावाच्या या शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनात अटी आणि शर्ती लादून केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.माझी किडनी घ्या, ती विकून जी रक्कम येईल ती बँकेला द्या ..मात्र माझी सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा असे या युवा शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे हे निवेदन स्टँप पेपरवर लिहून देण्यात आले आहे.. अधुऱ्या या कर्जमाफीचा जाहीर निषेध..उरलेले कर्ज मी माझी किडनी विकून भरतो, तुम्ही ती विकत घ्या असे शेतकऱ्याने निवेदनात म्हटले आहे.