खळबळजनक! वाघजाळ गावात मध्यरात्री दरोडा; घरमालक पती - पत्नीला मारले..
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, काल मध्यरात्री वाघजाळ येथील सागर शिंबरे राहत्या घरी कुटुंबीयांसह झोपेत असतानाच, घराचा मागील दरवाजा अज्ञात चोरट्यांनी जोरात लोटल्यामुळे कडी उघडली, त्यानंतर चोरटे घरात शिरले. यावेळी शिंबरे झोपेतून उठले त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या पायावर मारहाण केली. घरातील असलेले सोन्याची दागिने किंमत (७०,५००) तसेच चांदीचे २००० रुपयांचे कडे व १७,५०० रुपयांची रोकड चोरी केली व पळून गेले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आज ,सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली असून श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.