सरसंघचालक मोहनजी भागवत ५ तास मेहकरात! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत आज,१० एप्रिल रोजी मेहकर शहरात येऊन गेले. तब्बल ५ तास मोहनजी भागवत मेहकर शहरात होते.
Advt. 👆
सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा उद्या छत्रपती संभाजी नगरात प्रवास आहे. त्यानिमित्ताने आज नागपूर वरून छत्रपती संभाजी नगरला जात असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास ते मेहकर शहरात आले. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असल्याने पोलीस प्रशासन आणि मोजक्याच संघ अधिकाऱ्यांना या प्रवासाची कल्पना देण्यात आली होती. संघाचे जिल्हा कार्यवाह सचिन देशमुख यांच्या निवासस्थानी मोहनजी भागवत यांनी जेवण केले. तिथेच संघ स्वयंसेवकांशी चर्चा करून ते छत्रपती संभाजीनगर कडे रवाना झाले.