संजय जाधव यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
Jan 10, 2025, 18:11 IST
बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : पत्रकार आणि पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हा बैठक आज 10 जानेवारीला स्थानिक पत्रकार भवनाच्या प्रांगणात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील नामवंत पत्रकार साम टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. संजय जाधव आता व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी तशी घोषणा आजच्या बैठकीत केली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संजय जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
शोध पत्रकारिता आणि आपल्या हटके बातम्यांमुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्य पातळीवर आपला ठसा उमटवणारे संजय जाधव बुलढाणा जिल्ह्यातील मीडिया क्षेत्रातील परिचित चेहरा आहेत. संजय जाधव यांच्या अनुभवाचा फायदा डिजिटल मीडियात पत्रकारिता करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना होणार आहे. संजय जाधव यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर सर्वच तरातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.