संदीपदादा शेळके यांची आठ किमी पायी वारी

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे घेतले दर्शन, राजुरेश्वर प्रासादिक दिंडीत सहभाग 

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी ११ जून रोजी देहू(पुणे) येथून पंढरपूरसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच राजूर येथून निघालेल्या राजुरेश्वर प्रासादिक दिंडीत सहभागी होत आठ किलोमीटर पायी वारी केली. 
दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात . महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातुन भाविक दिंडीत सहभागी होतात. त्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलेली असते. ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा न बाळगता वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या दिशेने निघतात. वारीची जुनी परंपरा आहे.  
देहू(पुणे) येथून ११ जून रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी भक्ती शक्ती चौक (पिंपरी चिंचवड) पुणे शहरात उत्साहात पालखीचे स्वागत करुन दर्शन घेतले. तसेच राजूर येथून निघालेल्या राजूरेश्वर प्रासादिक दिंडीमध्ये सहभागी होत आठ किमी पायी वारीत सहभाग घेत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, ह.भ.प विष्णू महाराज सास्ते, सुदर्शन पवार, यांची उपस्थिती होती.