दुखःद..! पत्रकार सुधीर पाटील यांना पितृशोक! विश्वनाथ शिवराम चेके यांचे निधन

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार सुधीर चेके पाटील यांचे वडील विश्वनाथ शिवराम चेके यांचे आज रविवार २८ जून रोजी सकाळी ९ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते. त्यांच्या अंत्यविधींचा कार्यक्रम आज दुपारी १ वाजता हिंदू स्मशानभूमी राऊतवाडी येथे होणार आहे .