चिखली नगरपरिषदेसाठी प्रभाग क्रमांक ११ मधून लढण्यास सज्ज! ॲड. शितल राजपूत म्हणाल्या, प्रभागाचा चेहरा–मोहरा बदलणार; विकासाचे व्हिजन घेऊन लोकांमध्ये जाणार....
Nov 7, 2025, 15:46 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २ डिसेंबरला चिखली नगर परिषदेसाठी मतदान होणार असून १० नोव्हेंबर पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान चिखली शहरातील प्रभाग क्रमांक मधून बुलढाणा जिल्ह्यातील ख्यातनाम व्यावसायिक, उद्योजक शिवदास राजपूत उर्फ पप्पू सेठ राजपूत यांच्या धर्मपत्नी ॲड. शितल राजपूत यांच्या नावाची जोरदार चर्चा जनमानसातून समोर येत आहे. प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव ॲड.शीतल राजपूत यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
रामा ट्रॅक्टर्स व हॉटेल रामा रिसॉर्टचे संचालक पप्पूसेठ राजपूत हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वलयांकित नाव आहे. पप्पू सेठ राजपूत यांच्या खांद्याला खांदा लावून ॲड.शितल राजपूत यांचादेखील सामाजिक कार्यात हिरारीचा सहभाग राहिला आहे. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून पप्पूसेठ राजपूत यांच्या नावाची ओळख आहे. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या ॲड.शीतलताई यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. सातत्याने लोकांच्या सुखा: दुखात राजपूत परिवाराचा सहभाग असतो, याच कार्याची पावती म्हणून आता ॲड.शीतलताई यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवावी अशी मागणी जनमानसातून समोर आली आहे.
व्हिजन घेऊन लोकांसमोर जाणार...
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी विकासाची गंगा चिखली शहरात आणली आहे. आ.सौ. श्वेताताईंचे हात बळकट करण्यासाठी नगरपरिषदेत सत्ता आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपने उमेदवारीची संधी दिल्यास विकासाचे व्हिजन घेऊन लोकांसमोर जाऊ.. माय बाप जनतेने संधी दिली अस प्रभागाचा चेहरा मोहरा बदलवून दाखवू असा आशावाद ॲड.शीतलताई राजपूत बोलून दाखवला...