BREAKING बुलडाणा शहर ठाणेदारपदी रवी राठोड! सगळं काही नीट चालू असतांना नरेंद्र ठाकरेंची बदली; अस काय झालं?
Updated: Apr 16, 2025, 20:13 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदावर आता पोलीस निरीक्षक रवी राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास बारा ते तेरा महिने सुरळीत आणि अगदी नीटनेटका कारभार सांभाळणाऱ्या नरेंद्र ठाकरे यांची बदली करण्यात आली आहे. नरेंद्र ठाकरे यांचा जवळपास १ वर्ष कार्यकाळ शिल्लक असताना अचानक त्यांची बदली करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही.
नरेंद्र ठाकरे यांची खामगाव येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. बुलडाणा शहर पोलिस स्टेशन हद्दीत नरेंद्र ठाकरे यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. शिवाय जिल्हा केंद्र असल्याने वर्दळीचे पोलिस स्टेशन असूनही गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्यात ठाकरे यशस्वी झाले होते. व्हीआयपी नेत्यांचे दौरे, शहरात सार्वजनिक स्वरूपात साजरे होणारे सर्वच कार्यक्रम ठाकरे यांच्या नियोजनात निर्विघ्नपणे पार पडले होते.मात्र असे असताना देखील नरेंद्र ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच का बदली करण्यात आली हे मात्र समजू शकलेले नाही. दुसरीकडे आता नव्याने बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदाची जबाबदारी मिळालेल्या रवि राठोड यांच्याकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा बुलडाणेकरांना राहणार आहे. रवी राठोड आतापर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते..