राजर्षी शाहू मल्टिस्टेटला बँको पुरस्कार दिव दमण येथे दिमाखदार सोहळ्यात संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनी स्वीकारला पुरस्कार
Feb 14, 2024, 16:25 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्राहकांना सर्वोत्तम बँकींग सेवा प्रदान करणाऱ्या राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीला सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बँको पुरस्कार मिळाला आहे. दिव दमण (गुजरात) येथे १३ फेब्रुवारी रोजी एका दिमाखदार सोहळ्यात संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सहकारी पतसंस्थांसाठी दिव दमण येथे दोन दिवसीय ऍडव्हानटेज सहकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. सहकारातील महत्वाच्या विषयांवर चर्चासत्र आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले. सहकार परिषदेला राज्यातील नामवंत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीला सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार मिळाला.
ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सुरु असलेल्या कार्याची दखल पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली. या गोष्टीचे विशेष समाधान आहे. पुरस्कार मिळाल्याने आणखी जबाबदारी वाढली असून नवी ऊर्जा मिळाली आहे. आपल्याकरिता हा अभिमानाचा क्षण असून हा पुरस्कार संस्थेचे ग्राहक, खातेदार, ठेवीदार यांना अर्पण केल्याची प्रतिक्रिया मालतीताई शेळके यांनी व्यक्त केली. यावेळी सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, पवन सावळे यांची उपस्थिती होती.