राजर्षी शाहू मल्टिस्टेट,  शाखा बिबीचा आगळा वेगळा वर्धापन दिन!   व्यवस्थापक म्हणाले, छोट्याश्या शाखेचा 'वटवृक्ष' झाला, म्हणून 'असा' साजरा केला वर्धापन दिन ! 

 
बिबी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)बिबी येथील राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चौथा वर्धापन दिन वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. 

प्रारंभी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी  बिबीचे ठाणेदार संदीप पाटील, उपसरपंच भास्कर खुळे, दीपक गुलमोहर, विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले, शाखा व्यवस्थापक शंकर देवकर, प्राचार्य आर.बी. राठोड शिक्षक ऋषी दंदाले ,गोविंद राठोड, गैबी ढाकणे, शिवानंद नागरे, संतोष केंद्रे, प्रभाकर डहाळके, ज्ञानेश्वर कुहीटे यांच्यासह शाखेचे कर्मचारी, खातेदार उपस्थित होते.

  
विभागीय व्यस्थापक गोविंद येवले यांनी छोट्याशा शाखेचा वटवृक्ष कसा झाला असा अनुभव सांगितला. यामुळेच असा वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला. तसेच निसर्गाचा समतोल राखायचा असेल आणि बदलते ऋतुचक्र थांबवायचे असेल तर वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय असून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन  व्यवस्थापक येवले यांनी केले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.