राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलडाणा मिशनच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ! आतापर्यंत २५०० जणांनी वाहिल्या रक्तरुपी समिधा; यंदा रेकॉर्डब्रेक संकलन होण्याचा विश्वास..
१३ फेब्रुवारीला संदीप शेळके यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्हाभरातील प्रमुख ठिकाणांसह जिल्ह्याबाहेरील देखील रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. २५ जानेवारीपासून तर २८ फेब्रुवारीपर्यंत ५१ ठिकाणी रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता, त्यात २५०० जणांनी आपल्या रक्तरुपी समिधा अर्पित केल्या आहेत. १३ मार्च पर्यंत आणखी बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम होणार असल्याने यंदा ३००० बॅग पेक्षा अधिक रक्तसंकलन होऊन गेल्यावर्षीचा रेकॉर्ड तुटणार असल्याचा विश्वास आयोजकांना आहे..
रक्तदान लोकचळवळ व्हावी हा उद्देश ..
जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेळके यांनी राजकीय परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. जिल्हावासियांच्या सुखदुःखात संदीप शेळके कायम अग्रभागी असतात. जिल्ह्याच्या आरोग्यविषयक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. दररोज अनेक रुग्णांचे, रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन संदीप शेळके यांना येतात. अशावेळी तातडीने आवश्यक ती मदत संदीप शेळके यांच्याकडून संबधित रुग्णांना होते. बहुतांश फोन हे रक्तासाठी असतात. रक्तदानाच्या पुरेशा जनजागृती अभावी अनेक रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा होत नाही, जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रक्तपेंढ्यामध्ये कायम रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळे रक्तदान ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने संदीप शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचा महायज्ञ हा उपक्रम राबवित असल्याचे वन बुलडाणा मिशनचे जिल्हा कार्यालय प्रमुख गोविंद येवले यांनी सांगितले.