नियमबाह्य डिजे वाजवणे भाेवले; दाेन डिजे केले जप्त; शेगावात माेटार वाहन निरीक्षकांची कारवाई; ४८ हजारांचा केला दंड ..!
Aug 30, 2025, 17:15 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :गणेश चतुर्थीच्या दिवशी नियमबाह्यरित्या डीजे वाजविणे दाेघांना चांगलेच भाेवले आहे. शेगाव शहरात दाेन डिजेवर मोटर वाहन निरीक्षक संदीप तायडे यांनी २९ ऑगस्ट रोजी ४८ हजार रुपयांचा दंड आकारून कारवाई केली.
रोकडिया नगर परिसरात वाजविण्यात आलेल्या एमएच ४३ एडी ०२२१ न्यू झंकार धुमाल बँड पार्टी (बाळापूर) या डीजेव्हर २३ हजार तर एमएच ०४ ईवाय ९८२१ टीएस धुमाल (खामगाव) या डीजेवर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.दाेन्ही डिजे शेगाव पाेलिस ठाण्यात लावण्यात आले आहेत. याप्रसंगी ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की, मंडळांनी डीजेचे दुष्परिणाम लक्षात घेऊन डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून सण साजरे करावेत.
ही कारवाई संदीप तायडे (मोटर वाहन निरीक्षक), अनिरुद्ध देवधर (मोटर वाहन निरीक्षक) आणि विनोद जाधव (सहाय्यक) यांनी केली.