पेनटाकळीकरांच्या घरांचे स्वप्न होणार साकार! केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश; प्रकल्पग्रस्तांनी मानले ना. जाधवांचे आभार...

 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखेर प्रयत्नांना यश मिळालंय.. पेनटाकळी प्रकल्पग्रस्तांना अखेर आता हक्काच घरं मिळणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला आहे. पेनटाकळी गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे घर बांधण्यासाठी प्लॉट चे वितरण केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही नेतृत्वाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
 
१९९८ पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रश्नासाठी गावकऱ्यांनी बारा दिवस प्रकल्पाच्या काठावर गावठाण हद्दवाढीसाठी उपोषण केले होते.केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मागील अनेक वर्षे पासून लक्ष घालून प्रशासकीय पातळीवर व मंत्रालय येथे पाठपुरावा केला होता .
शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या प्लॉट्सचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला व समस्या दूर केल्या आहेत. यावेळी तहसीलदार निलेश मडके,सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके,तलाठी सागरजायगुडे,ग्रा.पं.अधिकारीडी.बी.काळे,मोहन मगर, गजानन लहाने,जी.पी.मवाळ,संरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी,शिवसेनेचे पंजाबराव इंगळे,पुंजाजी इंगळे,भुंजगराव इंगळे,संतोष डुकरे,अमोल म्हस्के,सरपंच ,ग्रामस्थ,प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.