दहावीच्या निकालात "पवार सायन्स क्लासेस"चा पुन्हा दबदबा! १० विद्यार्थ्यांना सायन्स-मॅथमध्ये ‘आउट ऑफ’, ७० हून अधिक विद्यार्थ्यांना ९०+ गुण..

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख निर्माण केलेल्या पवार सायन्स क्लासेसने यंदाच्या दहावीच्या निकालातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. ८ मे रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात पवार सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

यंदाच्या निकालात तब्बल १० विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष चमक दाखवली. तसेच आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष, नियमित टेस्ट सिरीज, संकल्पनांवर आधारित अध्यापन पद्धती आणि पालकांशी सातत्याने ठेवला जाणारा संपर्क हेच या यशामागील प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे.

श्री. विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पवार सायन्स क्लासेस”ने गेल्या अनेक वर्षांत जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ११ वी-१२ वी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “करिअर पॉईंट कोटा, शाखा बुलढाणा” या संस्थेलाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही संस्थांचा दरवर्षीचा निकाल गौरवास्पद राहिला असून यंदाही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक विजय पवार यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 दहावीतील गुणवंत विद्यार्थी

* स्वराज भारोटे — सायन्स १००, मॅथ्स ९८
* कृतिका अंभोरे — मॅथ्स १००, सायन्स ९९
* सेजल खंबायतकर — मॅथ्स १००, सायन्स ९७
* प्रगती पंडित — मॅथ्स १००, सायन्स ९७
* ऋतुजा जाधव — मॅथ्स १००, सायन्स ९५
* ऋचा जवरे — मॅथ्स १००, सायन्स ९६
* ईशांत घट्टे — मॅथ्स १००
* गौरवी पैठणे — मॅथ्स १००
* स्वराज टेकाळे — मॅथ्स १००
* सोमेश तळेकर — मॅथ्स १००