आमचा धनुष्यबाण चोरला हो...! बुलडाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोलीस ठाण्यात तक्रार...
Updated: Feb 20, 2023, 18:48 IST
बुलडाणा(राहुल रिंढे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान आज, २० फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंच्या गटाकडून बुलडाण्यात निवडणूक आयोगाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. आमचा धनुष्यबाण मिंधे गटाने चोरलाय अशी तक्रारच बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.