हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त उद्या चिखलीत भव्य रोगनिदान व औषधोपचार, रक्तदान शिबिर! "या" नामांकित डॉक्टरांचा सहभाग....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वीर शिरोमणी, महापराक्रमी योद्धा हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती ९ जून रोजी संपूर्ण देशभरात साजरा होणार आहे. यानिमित्ताने उद्या,८ जून रोजी चिखली शहरात हिंदुसूर्य महाराणा प्रताप मार्केट परिसरात हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकाजवळ भव्य रोगनिदान व औषधोपचार, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना तज्ञ डॉक्टरांचे देखील मार्गदर्शन मिळणार आहे. सकाळी ठीक ९ वाजता शिबीराला सुरुवात होणार आहे.
 ९ जून रोजी संपूर्ण देशभरात हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे . हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्या चिखलीमध्ये होणाऱ्या शिबिरात बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान तज्ञ डॉक्टर देखील या शिबिरात मार्गदर्शन करतील. त्यामध्ये ओन्कोलॅाजी कॅन्सर तज्ञ डॅा कल्याणसिगं गोठवाल (राजपुत) संभाजीनगर , स्त्रीरोग तज्ञ डॅा अजाबराव वसु , जनरल फिज़िशियन डॅा विष्णु इंगळे, दंतरोग तज्ञ डॉक्टर योगेश काळे, बालरोग तज्ञ डॉ शिवशंकर खेडेकर, डॉ अमोल राजपूत, डॉ राहुल राजपूत, होमिओपॅथी तज्ञ डॉ निवृत्ती परिहार, तसेच आयुर्वेद तज्ञ व जनरल फिजिशियन डॉ पंढरी इंगळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. उदय राजपूत, डॉ सागर चिंचोले, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ निलेश गोसावी, दंतरोग तज्ञ डॉ सागर ठेंग, डॉ विष्णू जाधव, डॉ. संदीप परिहार, डॉ. संदीप ठेंग, डॉ पूजा मोरे, जनरल सर्जन डॉ नेहा चिंचोले, मुळव्याधतज्ञ डॉ शंतनु देशमुख, स्त्रीरोगतज डॉ प्रवीण राजपूत, डॉ धनंजय परिहार, डॉ दीपक भगत, डॉ धनश्री देशमुख, नेत्रतज्ञ डॉ राहुल जोशी, डॉ संतोष सोमटकर, डॉ प्रसाद निकम, त्वचारोग तज्ञ डॉ सचिन खरात, डॉ वैशाली काळे, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अमित अरसुडे, कान मग घशातज्ञ डॉ. सुनील केवट, आयुर्वेद व जनरल फिजिशन डॉ. सुरज राजपूत तसेच मुळव्याध तज्ञ डॉ. विष्णु गिरी रुग्णांच्या आजारावर मार्गदर्शन करतील. यावेळी सुनील रामसिंह चुनावले आयुर्वेदिक महाविद्यालय चिखली येथील तज्ञ डॉक्टरांची टीम रक्त तपासणी करणार आहेत. या शिबिराला फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्रचे सोमेश इंगळे व चिखली मेडिकल लॅब असोसिएशन, केमिस्ट्री असोसिएशनचे सहकार्य मिळत आहे.