२९ मे रोजी चिखलीत माहौल रंगणार! हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम; भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन! हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; पप्पूसेठ राजपूत यांचे आवाहन.....
May 27, 2025, 12:47 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २९ मे रोजी चिखलीत हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने तयारीला वेग आला आहे. या कार्यक्रमांत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पप्पूसेठ राजपूत यांनी केले आहे..
चिखली शहरात दरवर्षी हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी जयंती उत्सव समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २८ मे रोजी मध्यरात्री हिंदुसुर्य महाराणा प्रताप स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. २९ मे रोजी सकाळी ७ वाजता हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचा अभिषेक व पूजन कार्यक्रम संपन्न होईल. सकाळी ९ वाजता रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर आहे. सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत चिखली शहरातून रथ मिरवणूक व भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. चिखली शहरातील कार्यक्रमानंतर सायंकाळी तालुक्यातील गावागावात हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी होणार आहे..या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीसह सामाजिक कार्यकर्ते पप्पूसेठ राजपूत यांनी केले आहे..