अश्लील मॅसेज अन् ३५ लाख! जिल्हा परिषदेतील "त्या" लफडेबाज अधिकाऱ्याच्या आणखी एका मॅटरची दबक्या आवाजात चर्चा...
हे मॅटर तसे फ्लॅटमध्ये मार खाण्याच्या १५ दिवस आधीचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फ्लॅट मधील मॅटर प्रेयसी शी संबंधित होते. मात्र हे अश्लील मॅसेज प्रकरण वेगळेच आहे. या लफडेबाज अधिकाऱ्याच्या अधिनस्त जिल्हाभरात महिला कर्मचारी देखील आहेत. प्रत्येक महिन्या दोन महिन्याला यात नव्या अधिकाऱ्यांची–कंत्राटी कर्मचाऱ्यांची भर पडतेच. ती कशी पडते हे वेगळे सांगण्याची गरज नाही, त्यासाठी अधिकाऱ्याचे दोन "कलेक्ट–कर" असलेले चंगू मंगू आहेतच..
तर असो..गोष्ट अशी आहे की, या लफडेबाज अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याला अश्लील मॅसेज केले होते म्हणे..आता ही महिला काही त्याचे ऐकून घेणारी निघली नाही..प्रकरण डायरेक्ट एका नेत्याकडे गेले..तिथं लफडेबाज अधिकाऱ्याला बोलावणं झालं.. अन् मोठ्या तडजोडीनंतर मॅटर सॉल्व झालं..ही तडजोडीची रक्कम कुणी म्हणते ३५ लाख ,कुणी म्हणते ४० लाख..एवढी रक्कम अधिकाऱ्याने का स्वतःच्या खिशातून दिली म्हणा, त्यासाठी अधिकाऱ्याचे दोन "कलेक्ट –कर" आहेतच.. तर असं आहे भो ते...!