आता टेन्शन मिटणार! स्वस्तात मिळणार खडकपूर्णाची रेती! ऑनलाइन करा नोंदणी, घरपोच मिळवा रेती! शासनाचा पुढाकार...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवैध रेती वाहतुकीमुळे रेतीचे अव्वाच्या सव्वा आहेत. ४ ब्रास रेतीसाठी कुठे १६ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र आता हा खर्च निम्म्यावर येणार आहे. नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणाली द्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथील गट क्रमांक २७५ मधील वाळू डेपोमधून रेतीची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली आहे.. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
रेतीचा प्रतिब्रास दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १ हजार २३० रुपये प्रतिबास या दराने रेती मिळणार असून वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल. रेती खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी https://mahakhanij. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ई महा सेवा केंद्रातून देखील रेतीची ऑनलाइन मागणी नोंदवता येईल. रेतीची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत रेती घेऊन जाणे बंधनकारक आहे...
  रेतीमाफियांच्या जाचातून मिळणार सुटका...
जिल्ह्यात अवैध रेती माफी यांच्या माध्यमातून रेतीची अव्वाच्या सव्वा दराने विक्री केल्या जाते. बांधकामासाठी आवश्यक असल्याने नाईलाजाने मोठी रक्कम करून रेती घ्यावी लागते. ४ ब्रास रेतीच्या टिप्पर साठी १६ हजारांपासून ते २० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र आता शासनाकडून रेती खरेदी करताना स्वस्तात रेती उपलब्ध होणार आहे..