बुलढाण्यात पत्रकार बांधवांना 'वृत्तगौरव पुरस्काराचे' थाटात वितरण; पत्रकार रजीतसिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत, शौकत शहा यांना प्रदान ;
भाईजी म्हणाले, माणस फाउंडेशनच्या कार्याला आगामी काळात मोठा वाव
Updated: Aug 10, 2024, 15:05 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाईव्ह वृततसेवा ) सहकारामध्ये ईश्वरा सारखीच ताकद आहे. राज्यात कुठे नसतील एवढ्या सहकारी संस्था ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. या संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य ही घडत आहे. याच सोबत प्रा. डी एस लहाने यांनी सुरू केलेले मानस फाउंडेशन चे कार्य हे देखील विधवांच्या जीवनात बदल घडविणारे असून आगामी काळात या कामाला मोठा वाव असल्याचे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी म्हणाले. पत्रकार रणजीतसिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत, शौकत शहा यांना मानस फाउंडेशनच्या वृत्तगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाईजी यांनी पत्रकारिता,समाजकारण यावर प्रभावी भाष्य केले......
पत्रकार भवन येथे वृत्तगौराव पुरस्कार वितरण सोहळा 9 ऑगस्ट रोजी थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी शिवसाई परिवारचे अध्यक्ष डॉ.वसंतराव चिंचोले होते. तर बुलढाणा अर्बन सर्वेसर्व राधेश्याम चांडक, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के , मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, राजेश देशमाने, मनसेचे नेते अमोल रिंडे , जिजाबाई राठोड,आयोजक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर, शाहीनाताई पठाण यांची उपस्थिती लाभली. पुढे बोलताना भाईजी म्हणाले पत्रकारिता हे खूप मोठे माध्यम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटले जाते. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे. पत्रकारांना समाजामध्ये मानसन्मान दिल्या जातो. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व असाच असतो. त्यामुळे पत्रकारांनी नवनवीन ज्ञान संपादन केले पाहिजे. जागतिक भाषांचा अभ्यास करून परिसरापुरते मर्यादित न राहता स्वतःला अद्यावत केले पाहिजे. काही पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करतात ही मोठी गोष्ट आहे. अशा पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्त्वाची बाब आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारा विषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
मानस फाउंडेशन करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झाले आहे. बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ, पत्रकारांची भूमिका मौलिक असल्याचे सांगून लहाने यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले. तसेच मानस फाउंडेशनच्या वतीने आगामी काळात विधवा भगिनींसाठी राज्यस्तरीय मेळावा बुलढाण्यात आयोजित करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला चांडक यांनीही दुजोरा देत शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.पत्रकार गणेश निकम यांनी आयोजनाची भूमिका मांडली माणस फाउंडेशन ला राज्यभर पोचविण्याच कार्य मिडीयाने केले त्यामुळे सर्व पत्रकार बांधव सत्कारास पात्र असल्याचे ते म्हणाले. प्रा लहाने यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला विधवा परिषदेचा उपक्रम हा केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून आगामी काळात याची नोंद इतिहास घेईल असे निकम म्हणाले. पत्रकार अनिल म्हस्के, राजेंद्र काळे, राजेश देशमाने यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या प्रवासावर नजर टाकली. सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजीत सिंग राजपूत यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याचे ऋण व्यक्त केले. मानस फाउंडेशन करीत असलेले विधवा साठीच कार्य ऐतिहासिक असल्याचे राजपूत म्हणाले.
कार्यक्रमासाठी मानस फाउंडेशनच्या अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर ,सुरेखा सावळे ,प्रज्ञा लांजेवार ,मनीषा वारे ,ज्योती पाटील, एडवोकेट संदीप जाधव ,पंजाबराव गवइ ,गौरव देशमुख, कडूबा सोनवणे, दिनकर पांडे, गजानन मुळे ,किरण पाटील ,आदींनी परिश्रम घेतले. संचलन मनीषा वारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शहीणा पठाण यांनी मानले.
कार्यक्रमास पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
ज्ञान अद्ययावत करा
पत्रकारिता करतांना येणारी आव्हाने पेलण्याच सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावे, यासाठी पत्रकारांनी स्वतःला काळानुरूप 'अपडेट' केले पाहिजे.सामाजिक,राजकीय विषयासोबत ,राज्य,देश,व आंतरराष्ट्रीय विषयाचा सखोल अभ्यास व जागतिक संवादाचे माध्यम भाषांचे ज्ञान मिळविल्यास पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच जसे तीन वर्षातून प्रशिक्षण होते, पडताळणी होते. त्याच पद्धतीने पत्रकार बांधवांसाठी नवनवीन ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण केल्यास परिणामकारक पत्रकारिता करणे अजून चांगल्या पद्धतीने शक्य होईल. जे पत्रकार समाजाभिमुख कार्य करतात त्यांचा गुणगौरव देखील गरजेचा असल्याचे सांगून बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक ऊर्फ भाईजी यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार रणजीत सिंग राजपूत, पुढारी न्युज चैनल चे संदीप वानखेडे, दैनिक बातमी जगत संपादक कैलास राऊत, व एशिया मंचचे संपादक शौकत शहा यांचे कौतुक केले.